शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या २१३६ भटक्यांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखेने गेल्या महिनाभरापासून धडक मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत २४ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, वाहतूक शाखेचे निरीक्षक ब्रिजपालसिंग ठाकूर आदींच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेच्या १४ कर्मचाऱ्यांनी मोहीम सुरू केली.

ठळक मुद्देसव्वाचार लाखांचा दंड वसूल : लॉकडाऊन मोडून फिरणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच

प्रकाश लामणे।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन तंतोतंत पाळणे आवश्यक आहे. मात्र नियम मोडून विनाकारण गावात फिरणाºया नागरिकांमुळे धोका वाढत आहे. अखेर अशा २१३६ भटक्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करीत चार लाख २८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला.जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखेने गेल्या महिनाभरापासून धडक मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत २४ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, वाहतूक शाखेचे निरीक्षक ब्रिजपालसिंग ठाकूर आदींच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेच्या १४ कर्मचाऱ्यांनी मोहीम सुरू केली. छत्रपती शिवाजी चौक, महात्मा फुले चौक, सुभाष चौक, महात्मा गांधी चौक, नाईक चौक, श्रीरामपूर परिसर आदी भागात कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ट्रीपल सीट, विना परवाना वाहन चालविणे, विना सीटबेल्ट वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, डबलसीट वाहन चालविणे, संचारबंदी असूनही विनाकारण रस्त्यावर भटकणे आदी बाबींसाठी २१३६ नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चार लाख २८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. विनाकारण फिरणाºयांमध्ये या मोहिमेने वचक निर्माण झाला आहे.मास्क टाळणारे ३४६ जण सापडलेकोरोना टाळण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. मास्क टाळणाºयांविरुद्ध नगरपरिषदेने कारवाई सुरू केली आहे. २० एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत ३४६ जणांवर कारवाई करून एक लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, नायब तहसीलदार किशोर वानखेडे यांच्या मार्गदर्शनात अविनाश अर्धापूरकर, प्रशांत देशमुख, राजेश पवार, धर्मेंद्र ठाकूर आदींनी ही धडक मोहीम राबविली. मास्क न वापरणाऱ्या ३३ जणांकडून ६६००, सामाजिक अंतर न पाळणाऱ्या २८७ जणांकडून ५७ हजार ४०० रुपये तर सामाजिक अंतर न पाळणाऱ्या २६ व्यापाऱ्यांकडून ५६ हजार रुपये वसूल करण्यात आले.कोरोना संकट टाळण्यासाठी नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही सुरुच राहील.- डॉ. व्यंकट राठोडउपविभागीय अधिकारी, पुसद.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस