चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची तलावात उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 17:49 IST2022-01-07T17:45:49+5:302022-01-07T17:49:45+5:30

घरासमोर सायकल चालविणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर तेथीलच एका विकृताने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आरोपी फरार होता पोलीस त्याच्या शोधात असताना शुक्रवारी त्याचा मृतदेहच तलावातून बाहेर काढण्यात आला.

accused in six year old girl rape case commits suicide | चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची तलावात उडी घेऊन आत्महत्या

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची तलावात उडी घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देदत्तापूर तलावात घेतली उडी

यवतमाळ : बलात्काराचा आरोप असणाऱ्या युवकाने दत्तापूर (निरंजन माहूर) येथील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. मृतकाचे नाव स्वप्निल वसंत खारवडे (२१, रा. यवतमाळ) असे आहे.

यवतमाळ शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटीमध्ये घरासमोर सायकल चालविणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर स्वप्निल खारवडे याने अत्याचार केल्याची तक्रार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या प्रकरणी त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. घटनेपासून स्वप्निल खारवडे हा फरार होता. पोलीस त्याच्या शोधात असताना शुक्रवारी त्याचा मृतदेहच तलावातून बाहेर काढण्यात आला.

एचएच २९ - एव्ही २५३१ या क्रमांकाची मोटारसायकल गुरुवारपासून तलावाच्या काठावर उभी होती. ही मोटारसायकल स्वप्निल खारवडे याची असल्याची चर्चा केली जात होती. स्वप्निलने तलावात उडी घेऊन आत्महत्या तर केली नाही ना, याविषयी तर्कवितर्क लढविले जात होते. त्यामुळे शुक्रवारी तलावामध्ये रेस्क्यु टीमकडून शोधमोहीम राबविण्यात आली. काही वेळानंतर स्वप्निल खारवडेचा मृतदेह तलावात आढळून आला. या प्रकरणी कळंब पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: accused in six year old girl rape case commits suicide