शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांचा लेखाजोखा केंद्राबाहेर दिसेल

By admin | Updated: February 15, 2017 02:53 IST

जिल्ह्यात येत्या १६ व २१ फेब्रुवारीला पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

जिल्हाधिकारी : मतदान केंद्रात मोबाईलसह जाण्यास मनाई दिग्रस : जिल्ह्यात येत्या १६ व २१ फेब्रुवारीला पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदाराला आपला उमेदवार निवडताना निर्णय घेणे सोपे जावे म्हणून प्रत्येक मतदान केंद्राबाहेर निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांचा लेखाजोखा उपलब्ध करून दिला जाणार आहे. मतदान केंद्राबाहेर फ्लेक्सवर उमेदवारांची माहिती प्रदर्शित केली जाईल. यात उमेदवाराचे नाव, वय, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, जवळ असलेली संपत्ती, दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असल्यास त्याची नोंद, दाखल गुन्हे या माहितीचा गोषवारा फ्लेक्सवर प्रदर्शित केला जाईल. मतदान करणाऱ्या मतदाराला आपण कुणाला मतदान करावे, यांचा निर्णय घेणे सोपे जावे तसेच निवडणुकीसाठी उभे असणारे उमेदवार व त्यांची पार्श्वभूमी सार्वजनिक करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने हे पाउल उचलले आहे. याची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. निवडणूक आयोगाने हा प्रयोग पहिल्यांदाच केला आहे हे इथे उल्लेखनीय. दिग्रस येथे निवडणूक कार्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आले होते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जावून निवडणूक कार्याचा आढावा ते स्वत: घेत आहेत. आढावा सभेला निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार किशोर बागडे, ठाणेदार शिवाजी बचाटे, गटविकास अधिकारी अमित राठोड, मुख्याधिकारी शेषराव टाले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय राठोड, सर्व नायब तहसीलदार, सर्व झोनल अधिकारी व सर्व पथक प्रमुख उपस्थित होते.