शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

‘सीआरएफ’मधून ८६१ कोटींचे रस्ते प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील आमदारांनी एकूण ८६१ कोटी ९९ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या २७ कामांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर केले आहे. येथून हे प्रस्ताव अमरावती येथे मुख्य अभियंत्यांकडे पाठविले गेले. मात्र तेथून सध्या १८ प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहे. उर्वरित नऊ प्रस्तावांचा दुसऱ्या टप्प्यात विचार होणार आहे. ‘सीआरएफ’च्या कामांचे सर्वाधिक प्रस्ताव भाजपच्या आमदारांचे आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम : सर्वाधिक १६९ कोटींची मागणी उईकेंची

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपल्या विधानसभा मतदारसंघात दळणवळणाची उत्तम कनेक्टीव्हीटी निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांनी ८६१ कोटींची कामे प्रस्तावित केली आहे. केंद्रीय रस्ते निधीमधून ही कामे मंजूर करून तेवढा निधी मिळविण्याचा आमदारांचा प्रयत्न आहे.केंद्रीय रस्ते निधी अर्थात ‘सीआरएफ’मधून निधी मिळावा म्हणून आमदारांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्ह्यातील आमदारांनी एकूण ८६१ कोटी ९९ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या २७ कामांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर केले आहे. येथून हे प्रस्ताव अमरावती येथे मुख्य अभियंत्यांकडे पाठविले गेले. मात्र तेथून सध्या १८ प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहे. उर्वरित नऊ प्रस्तावांचा दुसऱ्या टप्प्यात विचार होणार आहे. ‘सीआरएफ’च्या कामांचे सर्वाधिक प्रस्ताव भाजपच्या आमदारांचे आहे. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत.सर्वाधिक १६९ कोटी ९२ लाख रुपयांची आठ कामे राळेगावचे भाजपचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी प्रस्तावित केली आहे. आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी १४९ कोटी नऊ लाखांची तीन कामे प्रस्तावित केली. यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी १०७ कोटींची चार कामे प्रस्तावित केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे संजय राठोड यांनी १२ कोटी सात लाख रुपये किंमतीचे एकच काम प्रस्तावित केले आहे. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी एकूण ८३ लाखांची दोन कामे प्रस्तावित केली. उमरखेडचे आमदार नामदेव ससाने यांनी पाच कामांसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाला ११० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य नीलय नाईक यांनी ४१ कोटी १८ लाख रुपये किंमतीची दोन कामे सूचविली आहे. पुसद येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांनी तीन कामांसाठी ७८ कोटी ७९ लाख रुपयांची मागणी करणारे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केले आहे. पुसद येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी दोन कामांसाठी ६० कोटींच्या निधीची मागणी केली आहे.जिल्ह्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण, लहान-मोठ्या पुलांचे निर्माण, गतिमान वाहतूक निर्माण करणे यासाठी या निधीची मागणी केली आहे. सुरुवातीला ६७२ कोटींची ही कामे होती. त्यात १८९ कोटींच्या आणखी सात कामांची भर पडली.दारव्हा रोडचे काँक्रीटीकरण करणारआमदार मदन येरावार यांच्या यवतमाळ मतदारसंघातील शहराबाहेर जाणाऱ्या प्रमुख मार्गांचे काँक्रीटीकरण झाले आहे. आता दारव्हा रोडवरील दक्षता भवन ते लोहारा चौक या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ६८ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दहा वर्षांपूर्वी या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण तसेच सौंदर्यीकरण करण्यात आले होते. काँक्रीटीकरणाच्या प्रतीक्षेत यवतमाळातील हा एकमेव मार्ग सध्या शिल्लक आहे. त्याचाही प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक