शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

२८४७ जागांसाठी तब्बल ७६२६ उमेदवार मैदानात

By admin | Updated: April 14, 2015 01:46 IST

जिल्ह्यातील ग्रामपचांयत निवडणुकीच्या मैदानात दोन हजार ८४७ जागांसाठी तब्बल सात हजार ६२६ उमेदवार

ग्रामपंचायत निवडणूक : अडीच हजार उमेदवारांची माघारयवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपचांयत निवडणुकीच्या मैदानात दोन हजार ८४७ जागांसाठी तब्बल सात हजार ६२६ उमेदवार रिंगणात असून निवडणुकीची रणधुमाळी गावागावात चरण सीमेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील ४३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि पाच ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने वातावरण ढवळून निघाले असून गावागावात आता एकच चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतीची निवडणूक २२ एप्रिल रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४० ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाली. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १० हजार ७०६ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी दोन हजार ६५१ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. आता दोन हजार ८४७ जागांसाठी सात हजार ६२६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. निवडणुकीने ग्रामीण वातावरण ढवळून निघाले असून गावागावांत निवडणुकीचीच मोर्चेबांधणी सुरू आहे. (शहर वार्ताहर)उमेदवारी अर्जच न भरल्याने ५७ ग्रामपंचायतींचा पेच जिल्ह्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार होत्या. त्यातील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका अविरोध झाल्या. तर ५७ ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारच पुढे आले नाही. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या. त्यामध्ये यवतमाळ तालुक्यातील चांदापूर, वाटखेड, बोरगाव आणि चापडोहच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. पुसद तालुक्यातील सावंगी, वालतूर, खैरखेडा या गावांचाही समावेश आहे. तर मारेगाव, झरी, घाटंजी, उमरखेड तालुक्यातही पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जच आले नाही. वणी तालुक्यातील शेवाळा, चिंचोली, नवरगाव, परसोडा येथेही अशी स्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुका होणार नाही. ४० ग्रामपंचायती अविरोधजिल्ह्यातील ४० ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहे. यात सर्वाधिक पुसद तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पाच तालुक्यातील एकही ग्रामपंचायत अविरोध झाली नाही. नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी ४० गावातील नागरिकांनी सामंजस्याचा परिचय घेत ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करण्याला हिरवी झेंडी दिली.