शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

महामॅरेथॉनमध्ये धावला वणीतील ६७ वर्षांचा तरूण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

नामदेव श्रावण जेनेकर असे या मॅरेथॉनपटूचे नाव असून ते स्थानिक विठ्ठलवाडीतील रहिवासी आहेत. मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील जगन्नाथ महाराज विद्यालयाचे ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. ‘लोकमत’मधून या महामॅरेथॉनची माहिती मिळाल्यानंतर नागपूर येथे जाऊन नोंदणी केली.

ठळक मुद्देनागपुरात लोकमतचे आयोजन : सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने केले तीन किलोमीटरचे अंतर पार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे रविवारी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठ क्रीडांगणावर पार पडलेल्या प्लास्टो नागपूर महामॅरेथॉनमध्ये वणीतील ६७ वर्षीय तरूण सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी भाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. यात त्यांनी तीन किलोमिटरचे अंतर पार करून पदक पटकाविले.नामदेव श्रावण जेनेकर असे या मॅरेथॉनपटूचे नाव असून ते स्थानिक विठ्ठलवाडीतील रहिवासी आहेत. मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील जगन्नाथ महाराज विद्यालयाचे ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. ‘लोकमत’मधून या महामॅरेथॉनची माहिती मिळाल्यानंतर नागपूर येथे जाऊन नोंदणी केली. हजारोंमध्ये मीदेखील उत्साहाने सहभागी होत तीन किलोमिटरचे अंतर अगदी पार केले. धावताना कोणताही त्रास झाला नसल्याचे नामदेव जेनेकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. सदृढ आरोग्यासाठी सर्वांनीच धावले पाहिजे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. वयाच्या पन्नाशीपर्यंत मी दररोज व्हालीबॉल खेळत असे, अशी माहितीही त्यांनी दिली.मी धावण्याचा सराव करीत नसलो तरी दररोज किमान तीन किलोमिटर न चुकता पायदळ फिरतो. ठराविक योगासने करतो. नामदेव जेनेकर यांना शैक्षणिक कार्यासाठी सन २००० मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारदेखील मिळाला आहे. तसेच हरितसेनेचा पुरस्कारदेखील त्यांनी प्राप्त केला आहे. नामदेव जेनेकर यांना सामाजिक कार्याची आवड असून सेवानिवृत्तीच्या काळात सामाजिक कार्यासोबतच ते शेती व्यवसायही सांभाळत आहेत.खेळण्याच्या आवडीतूनच वेगाव येथे मी स्वत: पुढाकार घेऊन समता क्रीडा मंडळाची स्थापना केली. त्यातून खेळाडू तयार झालेत. सुदृढ आरोग्यासाठी दररोज व्यायाम, योगा आवश्यक आहे.- नामदेव जेनेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, वणी

टॅग्स :Socialसामाजिक