शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

13 मृत्युसह जिल्ह्यात 588 नव्याने पॉझिटीव्ह, 453 जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 19:05 IST

सोमवारी एकूण 4034 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 588 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3446 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

ठळक मुद्देसोमवारी एकूण 4034 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 588 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3446 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

यवतमाळ: गत 24 तासात 13 मृत्युसह जिल्ह्यात 588 जण  नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 453 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 58, 48, 45, 80, 54, 70 वर्षीय पुरुष व 53 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 52 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 32 व 71 वर्षीय महिला, नेर शहरातील 55 वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 588 जणांमध्ये 360 पुरुष आणि 228 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 193 पॉझेटिव्ह रुग्ण, दिग्रस 51, पांढरकवडा 49, पुसद 45, वणी 43, कळंब 39, दारव्हा 38, महागाव 37, नेर 23, मारेगाव 19, बाभुळगाव 17, उमरखेड 12, आर्णि 11, घाटंजी 8 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.

सोमवारी एकूण 4034 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 588 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3446 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3307 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2094 तर गृह विलगीकरणात 1213 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 34638 झाली आहे. 24 तासात 453 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 30572 आहे. तर जिल्ह्यात एकूण 759 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.73 असून मृत्युदर 2.19 आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 315637 नमुने पाठविले असून यापैकी 313588 प्राप्त तर 2049 अप्राप्त आहेत. तसेच 278950 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस