शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार हेक्टरवरील भुईमूगाला बसला फटका

By admin | Updated: June 3, 2017 00:45 IST

मे महिन्यातील वाढत्या तापमानाचा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवरील भुईमूगाला तडाखा बसला.

तापमान व उकाड्याचा कहर : शेतकऱ्यांना बियाण्यांचा संशय लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मे महिन्यातील वाढत्या तापमानाचा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवरील भुईमूगाला तडाखा बसला. अनेक शेतकऱ्यांना बियाणेच सदोष असल्याचा संशय येत असून कृषी विभागाने चौकशी समिती गठित केली आहे. सर्वाधिक महागडे पीक म्हणून भुईमूुगाकडे बघितले जाते. ओलिताची सोय असणारे शेतकरी उनहाळ्यात भुईमूगाची लागवड करतात. यावर्षी मुबलक पाणी आणि अनुदानावर मोठ्या प्रमाणात बियाणे मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भुईमूगाची लागवड केली. दरवर्षी साधारणत: आठ ते दहा हजार हेक्टरवर होणारी भूईमुगाची लागवड यावर्षी तब्बल ४० हजार हेक्टरवर पोहोचली. यामुळे जिल्ह्यात चांगले उत्पादन हाईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात शेंगांची काढणी करताना झाडाला शेंगाच नसल्याचे दिसून आले. यामुळे शेतकरी अवाक झाले. ज्या झाडाला किमान १५ ते २० शेंगा पकडणे अपेक्षित होते, त्याला केवळ एक ते दोनच शेंगा लागल्या. परिणामी शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे अवघड झाले. अनेक झाडांना एकही शेंग न लागणे, कमी शेंगा लागणे, दाणे परिपक्व न होणे, अशा शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी दररोज वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बियाण्याबाबतच संशय व्यक्त केला. खासगी आणि शासकीय बियाणे कंपन्याच्या बियाण्यांचा यात समावेश आहे. कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाचे पथक दाखल शेतकऱ्यांनी बियाण्यांबाबत संशय व्यक्त करताच त्यांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राचे पथक विविध भागात तपासणी करीत आहे. नेमक्या कशामुळे शेंगांची संख्या घटली, याचा हे पथक शोध घेत आहे. वाढलेल्या तापमानाने फूलगळ भुईमूगाची लागवड २५ जानेवारीपर्यंत करणे अपेक्षित असते. तथापि १५ फेब्रुवारीपर्यंत लागवड करता येते, असे खासगी बियाणे कंपन्या सांगतात. यामुळे शेतकऱ्यांनी १५ फेबु्रवारीपर्यंत लागवड केली. मार्च महिन्यात पीक फुलावर होते. हे पीक ३० अंशापर्यंतचे तापमान सहन करू शकते. प्रत्यक्षात तापमान ३५ अंशाच्यावर गेले. यामुळे फूलगळ मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा फटका शेंगांना बसला आहे.