शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वणीतून केली ४० जनावरांची सुटका

By admin | Updated: May 15, 2016 02:01 IST

वणी-वरोरा मार्गावरून दोन दोन वाहनात आदिलाबादकडे कत्तलीसाठी नेणाऱ्या ४० मुक्या जनावरांची येथील श्रीराम सेनेने पोलिसांच्या सहकार्याने सुटका केली.

वणी : वणी-वरोरा मार्गावरून दोन दोन वाहनात आदिलाबादकडे कत्तलीसाठी नेणाऱ्या ४० मुक्या जनावरांची येथील श्रीराम सेनेने पोलिसांच्या सहकार्याने सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. दोघांना अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास सावर्लानजीक घडली.किशोर देवीदास रामटेके (४२), शेख जाकीर शेख अमद (३८) दोघेही रा.चंडिका वॉर्ड भद्रावती (चंद्रपूर) हे दोघेही शनिवारी सकाळी ७०.३० वाजताच्या सुमारास वरोरा येथून एम.एच.३४-एम.३४९८ या वाहनातून १७ मुक्या जनावरांना निर्दयीपणे वाहनात कोंबून आदिलाबादकडे नेले जात होते. हे वाहन श्रीराम सेनेचे जिल्हा सहसचिव नरेश निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत निमकर, विक्की परगंटीवार, जिल्हाध्यक्ष नीलेश परगंटीवार, गुढीपाडवा हिंदू समितीचे अध्यक्ष कपिल कुंटलवार, बजरंग दलाचे अध्यक्ष पवन शर्मा, सचिव पलाश बोंडे, संदीप वाघमारे यांनी सावर्लानजीक अडविले. या वाहनाची त्यांनी झडती घेतली असता, वाहनात १७ जनावरांना दोरीने बांधून निर्दयीपणे तेलंगणा राज्यातील आदिलाबादकडे नेण्यात येत असल्याचे आढळून आले. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनाला अडवून सहायक पोलीस उपनिरीक्षक चांदेकर यांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून किशोर रामटेके व शेख जाकीर शेख अमद या दोघांना ताब्यात घेतले. या १७ जनावरांना रासा येथील संस्कार माऊली गुरू गणेश गोशालेत ठेवण्यात आले. याप्रकरणी दोघांविरूद्ध कलम ११ (१) (घ), ११ (१) (ड), ११ (१) (झ) व ५ (अ) नुसार गुन्हा दाखल झाला.शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ट्रक एम.एच.४०-वाय.८८३४ ने २३ जनावरांना कोंबून नेण्यात येत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीही वरोरा टी पॉर्इंट घटनास्थळ गाठून ट्रक चालक इमरान शेख ईजार शेख रा.कामठी (नागपूर), शेख मोहसीन शेख मोहबीन (नागपूर) व सुरेश सुखदेव चन्ने रा.बालाघाट (मध्य प्रदेश) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून २३ जनावरांची सुटका करण्यात आली. या २३ जनावरांनाही रासा येथील गुरू गणेश गोशालेत ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)