वणीतून केली ४० जनावरांची सुटका

By Admin | Updated: May 15, 2016 02:01 IST2016-05-15T02:01:05+5:302016-05-15T02:01:05+5:30

वणी-वरोरा मार्गावरून दोन दोन वाहनात आदिलाबादकडे कत्तलीसाठी नेणाऱ्या ४० मुक्या जनावरांची येथील श्रीराम सेनेने पोलिसांच्या सहकार्याने सुटका केली.

40 rescued animals from the forest | वणीतून केली ४० जनावरांची सुटका

वणीतून केली ४० जनावरांची सुटका

वणी : वणी-वरोरा मार्गावरून दोन दोन वाहनात आदिलाबादकडे कत्तलीसाठी नेणाऱ्या ४० मुक्या जनावरांची येथील श्रीराम सेनेने पोलिसांच्या सहकार्याने सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. दोघांना अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास सावर्लानजीक घडली.
किशोर देवीदास रामटेके (४२), शेख जाकीर शेख अमद (३८) दोघेही रा.चंडिका वॉर्ड भद्रावती (चंद्रपूर) हे दोघेही शनिवारी सकाळी ७०.३० वाजताच्या सुमारास वरोरा येथून एम.एच.३४-एम.३४९८ या वाहनातून १७ मुक्या जनावरांना निर्दयीपणे वाहनात कोंबून आदिलाबादकडे नेले जात होते. हे वाहन श्रीराम सेनेचे जिल्हा सहसचिव नरेश निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत निमकर, विक्की परगंटीवार, जिल्हाध्यक्ष नीलेश परगंटीवार, गुढीपाडवा हिंदू समितीचे अध्यक्ष कपिल कुंटलवार, बजरंग दलाचे अध्यक्ष पवन शर्मा, सचिव पलाश बोंडे, संदीप वाघमारे यांनी सावर्लानजीक अडविले. या वाहनाची त्यांनी झडती घेतली असता, वाहनात १७ जनावरांना दोरीने बांधून निर्दयीपणे तेलंगणा राज्यातील आदिलाबादकडे नेण्यात येत असल्याचे आढळून आले. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनाला अडवून सहायक पोलीस उपनिरीक्षक चांदेकर यांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून किशोर रामटेके व शेख जाकीर शेख अमद या दोघांना ताब्यात घेतले. या १७ जनावरांना रासा येथील संस्कार माऊली गुरू गणेश गोशालेत ठेवण्यात आले. याप्रकरणी दोघांविरूद्ध कलम ११ (१) (घ), ११ (१) (ड), ११ (१) (झ) व ५ (अ) नुसार गुन्हा दाखल झाला.
शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ट्रक एम.एच.४०-वाय.८८३४ ने २३ जनावरांना कोंबून नेण्यात येत होते.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीही वरोरा टी पॉर्इंट घटनास्थळ गाठून ट्रक चालक इमरान शेख ईजार शेख रा.कामठी (नागपूर), शेख मोहसीन शेख मोहबीन (नागपूर) व सुरेश सुखदेव चन्ने रा.बालाघाट (मध्य प्रदेश) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून २३ जनावरांची सुटका करण्यात आली. या २३ जनावरांनाही रासा येथील गुरू गणेश गोशालेत ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 40 rescued animals from the forest