शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

३८ जणांची अखेर कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझिटिव्ह अहवाल आलेले ३८ जण १४ दिवसांच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या ३८ पैकी ३ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित ३५ जण गृह विलगीकरणात राहणार आहेत.

ठळक मुद्देआता जिल्ह्यात केवळ सात कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीवर पोहोचली होती. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या कष्टाने आणि यशस्वी उपचारांमुळे ही संख्या थेट दहाच्याही आत आली आहे. गेल्या आठवडाभरापासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या ४५ पैकी तब्बल ३८ जणांना शनिवारी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आता यवतमाळात केवळ सात कोरोनाग्रस्त उरले आहेत.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझिटिव्ह अहवाल आलेले ३८ जण १४ दिवसांच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या ३८ पैकी ३ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित ३५ जण गृह विलगीकरणात राहणार आहेत.जिल्ह्यात आता अ‍ॅक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५ वरून सात इतकी कमी झाली आहे. २४, २५ आणि २६ एप्रिल यादरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली होती. त्यानंतर रुग्णवाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा पाहता-पाहता ९८ वर गेला होता. यापैकी तब्बल ९१ जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला लक्षणीय यश आले आहे.सुरवातीला केवळ यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र नंतर नेर आणि उमरखेड (धानोरा) येथे रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली. उमरखेड येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व ‘लो रिस्क’ अशा ६८ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच नेर येथील ‘हाय रिस्क’ व ‘लो रिस्क’ अशा ७६ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले असता यापैकी ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ७३ अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. उमरखेड, महागाव, नेर आणि सर्व यवतमाळ जिल्ह्यासाठी ही बाब समाधानकारक ठरली आहे.जिल्हा कोरोनामुक्त होणार - ना. राठोडयवतमाळ जिल्ह्यासाठी ही अतिशय दिलासादायक बाब असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे कौतुक केले आहे. जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या