दारव्हा तालुक्यात ३७ सदस्य अपात्र

By Admin | Updated: August 23, 2015 02:40 IST2015-08-23T02:40:31+5:302015-08-23T02:40:31+5:30

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसाच्या आता खर्चाचा हिशेब देण्यास कसूर केल्याने

37 members in Darwa taluka disqualified | दारव्हा तालुक्यात ३७ सदस्य अपात्र

दारव्हा तालुक्यात ३७ सदस्य अपात्र

दारव्हा : ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसाच्या आता खर्चाचा हिशेब देण्यास कसूर केल्याने दारव्हा तालुक्यातील ३७ निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे
सदस्यत्व अपात्र घोषित करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक लढणाऱ्या व्यक्तींनी निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसामध्ये सादर न केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दारव्हा तालुक्यातील निवडून आलेल्या व पायाभूत अशा १५५ ग्रामपंचायत उमेदवारांना ज्यांनी खर्च सादर केला नाही अशांना नोटीस देऊन अपात्र घोषित केले आहे. त्यात तालुक्यातील लाडखेडचे तीन सदस्य, नायगाव दाने, उजोना चार, पेकर्डा दोन, पाथ्रड देवी सहा, कामठवाडा एक, रामगाव (रामेश्वर) चार, घाटकिन्ही एक, कुंभारकिन्ही पाच, करजगाव दोन, तळेगाव चार, पिंपळखुटा तीन अशा एकूण ३७ निवउून आलेल्या सदस्यांचा समावेश आहे. तर ११८ निवडणूक लढविणाऱ्या परंतु निवडून न आलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे.
या सर्व १५५ जणांना आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षाकरिता ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 37 members in Darwa taluka disqualified