पोलिसांचा २४ तास बंदोबस्त अन् गरिबांना मदतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:00:07+5:30

कोरोनामुळे भोसा परिसरातील सीमा सील केल्या गेल्या आहे. तेथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना साहित्य पुरविणे हे पोलिसांचे काम नाही, तरीही समाज भान ठेवत पोलिसांकडून या नागरिकांच्या सुरक्षेसोबतच त्यांना मदतही केली जात आहे. मंगळवारी दुपारी पोलिसांच्यावतीने सील केलेल्या इंदिरानगर भागात दूध आणि ब्रेडचे ८०० पॅकेटस् अडचणीतील नागरिकांना वितरित करण्यात आले.

24-hour police protection and help to the poor | पोलिसांचा २४ तास बंदोबस्त अन् गरिबांना मदतही

पोलिसांचा २४ तास बंदोबस्त अन् गरिबांना मदतही

ठळक मुद्देभोसा परिसर : समाजसेवेचेही भान, ८०० पॅकेटस् दूध, ब्रेडचे वितरण, अडचणीत आलेल्यांसाठी सेवाधर्म

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नागरिकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे पोलिसांचे मुख्य काम. परंतु यवतमाळचे पोलीस या कामांसोबत २४ तास बंदोबस्त करून नागरिकांना लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या अडचणीच्या काळात मदतीचा हातही देताना दिसत आहे.
कोरोनामुळे भोसा परिसरातील सीमा सील केल्या गेल्या आहे. तेथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना साहित्य पुरविणे हे पोलिसांचे काम नाही, तरीही समाज भान ठेवत पोलिसांकडून या नागरिकांच्या सुरक्षेसोबतच त्यांना मदतही केली जात आहे. मंगळवारी दुपारी पोलिसांच्यावतीने सील केलेल्या इंदिरानगर भागात दूध आणि ब्रेडचे ८०० पॅकेटस् अडचणीतील नागरिकांना वितरित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, अवधूतवाडीचे ठाणेदार आनंद वागतकर, यवतमाळ शहरचे ठाणेदार धनंजय सायरे व अन्य पोलीस अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
पोलिसांनी स्वत: त्या परिसरात फिरुन नागरिकांना दूध, ब्रेडचे वाटप करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्त ठेवणे हे पोलिसांचे काम असताना ते करून पोलीस जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहे. यवतमाळ पोलिसांचे या भूमिकेचे व मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: 24-hour police protection and help to the poor