शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

२३७ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: April 10, 2017 01:44 IST

दरवर्षी पाणीटंचाईने होरपळून निघणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात यंदा आत्तापर्यंत एकही टँकर सुरू झाला नाही.

तूर्तास एकही टँकर नाही : पुसद, महागाव तालुक्यात भीषण परिस्थितीयवतमाळ : दरवर्षी पाणीटंचाईने होरपळून निघणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात यंदा आत्तापर्यंत एकही टँकर सुरू झाला नाही. पुसद व महागाव तालुक्यालील जनतेला मात्र पाणीटंचाईचे तीव्र चटके बसू लागले आहेत. एप्रिल ते जून दरम्यान जिल्ह्यातील २३७ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.जिल्हा परिषदेने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन तब्बल दोन कोटी ८८ लाखांचा कृती आराखडा तयार केला. यात सर्वाधिक तरतूद जानेवारी ते मार्च दरम्यान उपाययोजना करण्यावर प्रस्तावीत होती. त्यासाठी एक कोटी ९६ लाखांचा खर्च अपेक्षित होता. प्रत्यक्षात मार्च महिना उलटल्यानंतर जिल्ह्यात कुठेही टँकर लावावा लागला नाही. मात्र एप्रिल ते जून दरम्यान किमान २५ टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी १८ लाख ३० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. एप्रिलच्या सुरूवातीपासूनच सूर्य आग ओकत आहे. विदर्भासह जिल्ह्यात पारा वाढला आहे. वाढत्या तापमानाने पाण्याचे बाष्पमीभवनही मोठ्या प्रमाणात होत असल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील पाणीसाठी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यात जिल्ह्यातील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या तीन महिन्यात २३२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यावर मात करण्यासाठी २५ टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. एप्रिल ते जून दरम्यान जिल्ह्यातील २३२ गावांमधील २३७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. सोबतच जिल्हा परिषदेने नळ योजनांची विशेष दुरूस्ती व दुहेरी हातपंपाच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे २४ प्रस्ताव सादर केले आहे. (शहर प्रतिनिधी)कृती आरखाड्यात असमतोलजिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या कृती आराखड्यात असमतोल दिसून येत आहे. या विभागाने जानेवारी ते मार्च दरम्यान १४ तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, ५२ गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तीन गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण आणि एक टँकर सुरू करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यासाठी एक कोटी ९६ लाखांची तरतूद करण्यात आली. मात्र एप्रिल ते जून दरम्यानच्या काळात २५ टँकर व २३७ विहीर अधिग्रहण उपापयोजना सुचविण्यात आल्या. त्यासाठी केवळ ९१ लाख ८६ हजारांची तरतूद केली गेली. वास्तविक या तीन महिन्यातच तीव्र उन्हाळा असतो. मात्र पाणीपुरवठा विभागाने पुरेशा उपाययोजना केल्या नाही. तथापि आता ऐनवेळी तसे २४ प्रस्ताव दाखल केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पाणीटंचाई निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही दिली होती. आता त्यांनी या संदर्भात ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.