शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांसाठी १७ लाखांची इनोव्हा

By admin | Updated: August 5, 2014 23:35 IST

संचालक मंडळ आणि सहकार प्रशासनाला अंधारात ठेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांसाठी १७ लाख रुपयांची नवी कोरी इनोव्हा गाडी खरेदी करण्यात आली आहे.

जिल्हा बँक : विनापरवाना खरेदी, संचालक मंडळही अनभिज्ञयवतमाळ : संचालक मंडळ आणि सहकार प्रशासनाला अंधारात ठेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांसाठी १७ लाख रुपयांची नवी कोरी इनोव्हा गाडी खरेदी करण्यात आली आहे. विनापरवाना झालेल्या या व्यवहारात सहकार प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्यास बँकेचे संचालक मंडळ अडचणीत येण्याची शक्यता आहे. शेतकरी दुष्काळाच्या सावटात आहेत, दुबार पेरणी बुडली आहे, तिबार पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसा नाही, बँक कर्ज देण्यास तयार नाही, बँकेची नव्या सभासदांना कर्ज देण्याची तयारी नाही, त्यासाठी कर्जाची वसुली न होणे, राज्य बँकेकडून कर्ज न मिळणे, पुरेसा पैसा उपलब्ध नसणे, अशी कारणे सांगितली जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या या बँकेत शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेऊन चैनीच्या वस्तूंवर उधळपट्टी केली जात आहे. बँकेच्या अध्यक्षांसाठी नुकतीच खरेदी करण्यात आलेली १७ लाखांची इनोव्हा गाडी या उधळपट्टीचाच एक भाग ठरली आहे. यापूर्वी अध्यक्षांसाठी अशाच पद्धतीने उधळपट्टी करताना तब्बल ४८ हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करण्यात आला होता.इनोव्हा गाडीची खरेदी करताना बँकेच्या संचालक मंडळाला विश्वासात घेतले गेले नाही, संचालकांच्या बैठकीत असा कोणताही प्रस्ताव ठेवला गेला नाही. १७ लाखांच्या या इनोव्हा खरेदीबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे अनेक संचालकांनी ‘लोकमत’ला सांगितले. एवढेच नव्हे तर सहकार प्रशासनालाही या खरेदीची पूर्व कल्पना नाही. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुका होईल. अवघे काही महिने शिल्लक राहिल्याचे पाहूनकाही संचालक बँकेतून मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करीत असल्याचे दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)