शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांना सोडण्यासाठी १५० ‘एसटी’ बसेस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

सर्व नऊही आगारांमधील १५० एसटी बसेस प्रशासनाचा आदेश येताच मार्गावर निघणार आहे. यादृष्टीने चालक कम वाहक, यांत्रिक पर्यवेक्षक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना अपडेट राहावे लागणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे परप्रांतातील नागरिक जिल्ह्यात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : महामंडळाला केवळ जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची वाट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कारणांमुळे अडकून पडलेल्या परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात सोडून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा यवतमाळ विभाग सज्ज झाला आहे. सर्व नऊही आगारांमधील १५० एसटी बसेस प्रशासनाचा आदेश येताच मार्गावर निघणार आहे. यादृष्टीने चालक कम वाहक, यांत्रिक पर्यवेक्षक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना अपडेट राहावे लागणार आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे परप्रांतातील नागरिक जिल्ह्यात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये कामगार, बाहेर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय बंद झाल्याने गावाकडे निघालेले, परराज्यातून जोखीम स्वीकारून मार्गावर असलेले नागरिक आदींचा समावेश आहे. या लोकांची प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्यांची गावाकडे परत जाण्याची तगमग पाहता प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. या लोकांना एसटी बसेसद्वारे त्यांच्या राज्यातील राजधानीपर्यंत पोहोचवून दिले जाणार आहे. प्रशासनाला फक्त शासनाकडून आदेशाची प्रतीक्षा आहे.तत्पूर्वी महाराष्ट्रात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी महामंडळाने तयारी केली आहे. जवळपास १५० बसेस आणि त्यासाठी लागणारा आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग तयार ठेवण्यात आला आहे. राजस्थान, बिहार, ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आदी राज्यातील अडकलेल्या लोकांना महामंडळाच्या बसेसद्वारे आवश्यक त्या दक्षता घेऊन सोडून देण्यात येणार आहे. जवळपास दोन हजार ७७८ नागरिक परप्रांतातील असल्याची माहिती आहे. अडकलेले नागरिक जिथे आहे तेथून घेऊन त्यांना संबंधित राज्यामध्ये पोहोचवून देण्यात येणार आहे.सव्वा कोटींचे बजेटपरप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठीचा खर्च महामंडळाने सुमारे एक कोटी २५ लाख रुपये सांगितला आहे. किलोमीटर, जीएसटी आदी बाबींचा खर्च यामध्ये समाविष्ट आहे. प्रत्येक बसमध्ये २२ प्रवासी घेण्याची महामंडळाची तयारी आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी यापेक्षा अधिक प्रवासी घेण्यास महामंडळाने असमर्थता दर्शविली आहे.परप्रांतीय लोकांना सोडून देण्यासाठी तयारी सुरू आहे. शासनाकडून आदेश आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. तशा पूर्वसूचना एसटी महामंडळाला दिल्या आहे.- ललितकुमार वऱ्हाडे,निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठीचा खर्च महामंडळाने सुमारे एक कोटी २५ लाख रुपये सांगितला आहे. किलोमीटर, जीएसटी आदी बाबींचा खर्च यामध्ये समाविष्ट आहे. प्रत्येक बसमध्ये २२ प्रवासी घेण्याची महामंडळाची तयारी आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी यापेक्षा अधिक प्रवासी घेण्यास महामंडळाने असमर्थता दर्शविली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या