शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या मोहात गमावले १५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 05:00 IST

आरोपींनी सोन्यासारखी नाणी दाखविली. लाळगे यांची खात्री पटल्यावर त्यांना पैसे घेऊन मुळावा ते शेंबाळपिंपरी रोडवर बोलविण्यात आले. लाळगे चालकाला घेऊन पोहोचले. तेथे दबा धरून असलेल्या पाच ते सहा जणांनी लाळगे व त्यांच्या चालकावर हल्ला चढवीत १५ लाखांची रोख हिसकावून घेतली. पैसे घेऊन आरोपींनी पोबारा केला. जीव वाचला म्हणून लाळगे परतले. तब्बल चार दिवसानंतर त्यांनी याप्रकरणी पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्त्याच्या बाजूने पाईपलाईनसाठी खोदकाम करीत असताना पाच किलो सोने सापडले आहे. ते घ्यायचे असेल तर १५ लाख रुपये घेऊन या, अशी टीप मुकादमाने स्वत:च्या मालकालाच दिली. सोन्याच्या लालची पडलेला मालक १५ लाखाची रोख घेऊन मुळावा ते शेंबाळपिंपरी रोडवर पोहोचला. येथे त्याला मारहाण करून त्याची रोख हिसकावून आरोपींनी पळ काढला. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली. सागर युवराज लाळगे (३८) रा. बहिरोबावाडी ता. कर्जत जि. अहमदनगर असे फसवणूक झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. सागर लाळगे यांनी पाईपलाईन टाकण्याचे कंत्राट घेतले आहे. त्यांच्या कामावरीलच मुकादम पिराजी याने सागर लाळगे यांना पाच किलो सोने खोदकामात मिळाल्याची माहिती दिली. ही माहिती खरी आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी सागर लाळगे व त्याचा चालक मनोहर तांदळे हे दोघे उमरखेडला आले. त्यावेळी आरोपींनी सोन्यासारखी नाणी दाखविली. लाळगे यांची खात्री पटल्यावर त्यांना पैसे घेऊन मुळावा ते शेंबाळपिंपरी रोडवर बोलविण्यात आले. लाळगे चालकाला घेऊन पोहोचले. तेथे दबा धरून असलेल्या पाच ते सहा जणांनी लाळगे व त्यांच्या चालकावर हल्ला चढवीत १५ लाखांची रोख हिसकावून घेतली. पैसे घेऊन आरोपींनी पोबारा केला. जीव वाचला म्हणून लाळगे परतले. तब्बल चार दिवसानंतर त्यांनी याप्रकरणी पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मुकादम पिराजी व त्याच्या पाच साथीदारांवर कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

वारंवार घटना, मोह सुटेना - मोठ्या प्रमाणात सोने असून ते विकायचे असल्याचे सांगत विशिष्ठ ठिकाणी बोलावून लुटमार झाल्याच्या यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतरही सोन्याचा मोह सुटताना दिसत नाही. 

 

टॅग्स :Goldसोनंfraudधोकेबाजी