शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यात डेंग्यूचे ११५ रुग्ण

By admin | Updated: September 1, 2014 23:54 IST

लांबलेला पावसाळा, तापणारे वातावरण आणि अधामधात कोसळणारा पाऊस अशा विषम वातावरणात जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकवर काढले आहे. गत तीन महिन्यात डेंग्यूचे ११५ रुग्ण आढळून आले असून

जिल्ह्यात प्रकोप : शासकीय यंत्रणा गाफीलचसुरेंद्र राऊत -यवतमाळ लांबलेला पावसाळा, तापणारे वातावरण आणि अधामधात कोसळणारा पाऊस अशा विषम वातावरणात जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकवर काढले आहे. गत तीन महिन्यात डेंग्यूचे ११५ रुग्ण आढळून आले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या आणि मृतांची कुठलीही नोंद शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध नाही. किटकजन्य आजाराचा प्रकोप होत असतानाही आरोग्य यंत्रणेकडून मात्र सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र आहे. यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. डेंग्यूच्या तापावर थेट उपचार नसल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. एकट्या वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात ११५ रुग्णांना डेंग्यू असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. जून महिन्यात सात रुग्ण तपासणीस आले होते. जुलैमध्ये हीच संख्या ४३ वर गेली. तर आॅगस्ट महिन्यात डेंग्यूचे ६५ रुग्ण दाखल झाले. हा केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांचा आकडा आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची कुठेही नोंद होत नाही. त्यामुळे अधिकृत आकडेवारी उपलब्ध होत नाही. यावर्षी सर्वाधिक तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याचे खासगी डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ असतानाही आरोग्य यंत्रणेकडून मात्र विशेष असे कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. शासकीय रुग्णालयामध्ये तीन महिन्यात दोन रुग्णांना डेंग्यूमुळे मृत्यू झाला. तर शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झालेल्यांची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यातील डेंग्यूच्या प्रकोपापासून आरोग्य यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)