शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

वणी तालुक्यातील ११ हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

२२ कोटी रूपयांचे अनुदान स्थानिक प्रशासनाच्या तिजोरीत प्राप्त झाले असून त्याचे वाटप केले जात आहे. असे असले तरी अद्याप ११ हजार शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेले सात कोटी रूपये शासनाकडून अप्राप्त असल्याने संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : २२ कोटी आले, सात कोटींची गरज

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दिवाळीच्या पर्वात या भागात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शासनाने मदत जाहीर केली. या मदतीतील २२ कोटी रूपयांचे अनुदान स्थानिक प्रशासनाच्या तिजोरीत प्राप्त झाले असून त्याचे वाटप केले जात आहे. असे असले तरी अद्याप ११ हजार शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेले सात कोटी रूपये शासनाकडून अप्राप्त असल्याने संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.सन २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात या भागात प्रचंड अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा फटका सोयाबीन आणि कपाशीला मोठ्या प्रमाणावर बसला. वणी तालुक्यातील १६१ गावातील ३१ हजार ६२६ शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे उभे पीक सडून गेले. कपाशी पिकाचेही नुकसान झाले. शेतकऱ्यांची एकूण परिस्थिती लक्षात घेता, शासनाने अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यानुसार सुरूवातीला पहिल्या टप्प्यात सात कोटींचा निधी प्राप्त झाला. त्याचे वाटप सुरू असतानाच दुसऱ्या टप्प्यातील १४ कोटी ९९ लाख, असे एकूण २१ कोेटी ९९ लाख रूपये शेतकऱ्यांसाठी प्राप्त झाले. हा निधी प्राप्त होताच स्थानिक प्रशासनाने आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या निर्दोष करून त्या बँकेकडे पाठविल्या. त्यानुसार वाटप सुरू झाले ेआहे. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान मिळाले नाही. २१ कोटी ९९ लाखाचे अनुदान २० हजार ८५५ शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. सात कोटी रूपयांचा तिसरा टप्पा प्राप्त झाल्यानंतर उर्वरित ११ हजार शेतकºयांना मदत दिली जाईल.पूरबाधित शेतकºयांना दीड कोटीचे वाटपसन २०१८ मध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला. यामुळे नदी-नाल्याच्या काठावरील शेतात पाणी शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाले. जवळपास सहा हजार ५१ हेक्टरवरील पिकाला बाधा पोहोचली. त्या शेतकऱ्यांना नुकतेच दीड कोटींचे अनुदान वाटप करण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी