शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

लातूरकडे निघालेले ११ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

याप्रकरणी १० मजूर व ट्रकचालकाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांना वणीलगतच्या पळसोनी येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. शेरखॉ पठाण नूरमोहम्मद असे आयशर चालकाचे नाव असून तो लातूर जिल्ह्यातील आघोरी येथील रहिवासी आहे.

ठळक मुद्देचंद्रपुरातील मजूर : फळांच्या रिकाम्या कॅरेटमागे लपून सुरू होता प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, ‘आहात तेथेच थांबा’ असा संदेश मुख्यमंत्र्यांकडून वारंवार दिला जात असतानाही अडकून पडलेले नागरिक आपापल्या गावाकडे जाण्यासाठी धडपड करीत आहेत. लॉकडाऊन असताना चंद्रपुरातून एका आयशर ट्रकमध्ये बसून लातूरकडे निघालेल्या १० मजुरांसह ट्रकचालकाला सोमवारी पहाटे वणी पोलिसांनी ताब्यात घेतले.याप्रकरणी १० मजूर व ट्रकचालकाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांना वणीलगतच्या पळसोनी येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. शेरखॉ पठाण नूरमोहम्मद असे आयशर चालकाचे नाव असून तो लातूर जिल्ह्यातील आघोरी येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध वणी पोलिसांनी कलम १८८, २६९, ५१६, २,३, ६६, १९२ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच आयशरमधून लपून प्रवास करणारे अहेमद पठाण गुड्डू पठाण, शेख अमजद शेख गफ्फूर, सलिम पठाण पाशा पठाण, उमेश संगनाथ कांबळे, सुलेमान पठाण जलाल पठाण, शेख मुन्ना शेख मकबूल, शेख ताजुद्दीन, शेख ईलाही, शेख आमिर शेख शामीर, शहजान खलील पटेल, आतार मेनुद्दीन ईलाही या १० जणांविरुद्ध कलम १८८, २७१, ५१६, २, ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वणी-चंद्रपूर मार्गावर झोला फाटा येथील पोलीस चौकीवर वाहनांची तपासणी केली जात असताना प्रवासी वाहतुकीचा हा प्रकार उजेडात आला. पोलिसांनी लगेच आयशर चालकासह आयशरमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याने त्यांना वसतिगृहात ठेवण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या