शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या अंतिम यादीत १०४५ मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

या मतदार यादीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मतदारांच्या अंतरिम यादीवर दोनशे पेक्षा अधिक आक्षेप नोंदविले गेले. त्यातील काही स्वीकारले तर काही फेटाळले गेले. या आक्षेपाच्या अनुषंगाने कित्येक नावे मतदार यादीतून हटविण्यात आली. मात्र महाविकास आघाडीच्या दबावात ही नावे हटविण्यात आल्याचा सूरही भाजपच्या गोटातून ऐकायला मिळतो आहे.

ठळक मुद्देदोनशे नावांवर आक्षेप : अनेक नावे हटविली, उच्च न्यायालयात आव्हान देणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : २६ मार्च रोजी संचालकांच्या २१ जागेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एक हजार ४५ मतदारांची अंतिम यादी शनिवारी रात्री उशिरा अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी जारी केली.या मतदार यादीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मतदारांच्या अंतरिम यादीवर दोनशे पेक्षा अधिक आक्षेप नोंदविले गेले. त्यातील काही स्वीकारले तर काही फेटाळले गेले. या आक्षेपाच्या अनुषंगाने कित्येक नावे मतदार यादीतून हटविण्यात आली. मात्र महाविकास आघाडीच्या दबावात ही नावे हटविण्यात आल्याचा सूरही भाजपच्या गोटातून ऐकायला मिळतो आहे. सक्षम कारण नसताना यादीतून नावे हटविण्याच्या विभागीय सहनिबंधकांच्या या निर्णयाला सोमवारी नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही कित्येकाने चालविली आहे. जिल्हा गटातील मतदारांचा आकडा ७०२ दिसत असला तरी त्यातील अनेक मयत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरम नसताना सभा घेणे, अवसायनात असणे, थकबाकीदार असणे अशा कारणांवरून नावे यादीतून बाद करण्यात आली.मतदार यादीही आता कोर्टकचेरीत अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आधीच सहनिबंधक, सहकार मंत्री, उच्च न्यायालय येथे विविध याचिका व त्यावरील निर्णय येण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे जिल्हा बँक संचालक निवडणुकीचा नेमका फॉर्म्युला काय राहील, याबाबत संभ्रम कायम आहे. परंतु या आठवड्यात संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जाते.अंतिम मतदार यादी जारी करण्यात आली आहे. विविध प्रलंबित याचिकांवरील निर्णय आठवडाभरात येण्याची अपेक्षा असून त्यानंतर सर्व संभ्रम दूर होण्यास मदत होईल. मतदार यादीवर दोनशे पेक्षा अधिक आक्षेप नोंदविले गेले होते.- राजेश दाभेरावविभागीय सहनिबंधक तथा सहकारी प्राधिकृत अधिकारी (सहकारी संस्था), यवतमाळ.

टॅग्स :bankबँक