शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुसद बीडीओसह १० ग्रामसेवक दोषी

By admin | Updated: September 8, 2014 01:46 IST

पुसद पंचायत समितीतील मस्टर घोटाळ्यात तत्कालीन बीडीओसह १० ग्रामसेवकांवर दोष सिध्द झाला आहे.

यवतमाळ : पुसद पंचायत समितीतील मस्टर घोटाळ्यात तत्कालीन बीडीओसह १० ग्रामसेवकांवर दोष सिध्द झाला आहे. यात दहीवड आसोलीचे एस.डी. हिंगाडे आणि पार्डी येथील के.बी. सोनटक्के या दोन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित आठ ग्रामसेवकांसह दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या घोटाळ्यासंदर्भात प्राप्त तक्रारीवरून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यावरून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी ही कारवाई केली.रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची प्रकरणे पुढे येत आहे. पुसद पंचायत समिती अंतर्गत रोहयोचा मस्टर घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता पंचायत समिती स्तरावरून ग्रामसेवकांनी ई-मस्टरचा उपयोग करण्याऐवजी म्यन्यूअल मस्टर वापरले. यासाठी कुठलीही पूर्व परवानगी घेण्यात आली नाही. मस्टरची मुदत संपल्यानंतरही त्याचा वापर केला गेला. त्याला व्हॅलीड करून घेण्यात आले नाही. एका ग्रामपंचायतीसाठी मंजूर असलेले मस्टर दुसऱ्याच ग्रामपंचायतीसाठी वापरण्यात आले. एस.डी. हिंगाळे या ग्रामसचिवाने पंचायत समितीत जाऊन स्वत:च स्टॉक बुकमध्ये मस्टरच्या नोंदी केल्या. यासह अनेक प्रकारची अनियमितता चौकशीत आढळून आली. या संपूर्ण प्रकरणात स्वतंत्र दोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे ठेवण्यात आला. मॅन्यूअल मस्टरचा वापर आणि दुसऱ्या ग्रामपंचायतीचे मस्टर वापरणे अशा स्वरूपाच्या या तक्रारी होत्या. या चौकशी अहवालात पुसद येथील तत्कालीन बीडीओ आणि तसेच प्रभारी बीडीओ यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय कृषी अधिकारी आर.पी. राठोड, कनिष्ठ सहायक एस.जी. पाटील, विस्तार अधिकारी यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय निलंबित ग्रामसेवकाव्यतिरिक्त आठ जणांवरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)