शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

१0 कोटींचा घोटाळा वांद्यात

By admin | Updated: May 13, 2014 00:14 IST

जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीसी) निधीतून गतवर्षी यवतमाळ आणि जोडमोहा वनपरिक्षेत्रात जल व मृद संधारणाची सुमारे १0 कोटींच्यावर रुपयांची कामे करण्यात आली.

यवतमाळ : जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीसी) निधीतून गतवर्षी यवतमाळ आणि जोडमोहा वनपरिक्षेत्रात जल व मृद संधारणाची सुमारे १0 कोटींच्यावर रुपयांची कामे करण्यात आली. त्यातील अनेक कामे बेपत्ता असून आढळणार्‍या कामांचा दर्जा निकृष्ट आहे. त्यातही निगरगट्ट अधिकार्‍यांनी गौण खनिजाच्या रॉयल्टीचा भरणाच केला नाही. नियोजनच्या कामात झालेल्या या दहा कोटींच्या घोटाळ्याची चौकशी वांद्यात आली असून ती थंडबस्त्यात आहे. यामुळे चौकशी अधिकारीच संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

मग्रारोहयोच्या कामांमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्यानंतर कंत्राटदार आणि वनाधिकार्‍यांचे पितळ उघडे पडले. चौकशीत भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून पाच वनाधिकारी निलंबित करण्यात आले. त्यामुळे अनेक कंत्राटदारांनी आपला मोर्चा जिल्हा नियोजन विकास निधीच्या कामांकडे वळविला. त्यातूनच २0१३ मध्ये यवतमाळ वनविभागातील यवतमाळ आणि जोडमोहा या दोनच वनपरिक्षेत्रात दहा कोटींच्यावर रकमेची मृद व जलसंधारणाची कामे करण्यात आली. कंत्राटदार आणि वनाधिकार्‍यांनी संगनमताने केलेल्या या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या. त्यामध्ये अनेक ठिकाणी कामेच बेपत्ता असल्याचा आरोप झाला. अनेक कामे नियोजित स्थळी आढळून आली. मात्र ती निकृष्ट झाली आहे. काही ठिकाणी तर जुन्याच कामांना लिपापोती करून ती नव्याने केल्याचे दर्शविण्यात आले. शिवाय अनघड दगडी बांध, मातीनाला बांध, वन तलाव, चर आदींच्या कामांमध्ये गौण खनिजांची रॉयल्टीच भरल्या न गेल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी १0 कोटींच्या या घोटाळ्याची चौकशी येथील महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे अभियंता गुलाबराव भोळे यांच्याकडे सोपविली होती. त्यांना या चौकशीचे आदेश प्राप्त होऊन सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र राजकीय दबाव आणि हितसंबंधातून ही चौकशी पुढे सरकलीच नाही. आजही ही चौकशी थंडबस्त्यात आहे. त्यामुळे खुद्द जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांच्या आदेशावरून सुरू झालेल्या चौकशीलाच हरताळ फासला गेल्याचे दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)