Next

Shailesh Ramugade: ­­मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुबाडणाऱ्या रीलस्टारला अटक; बीएमडब्ल्यू, आयफोन, दागिने जप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 08:05 IST2025-11-16T08:03:21+5:302025-11-16T08:05:04+5:30

Reel Star  Shailesh Ramugade Arrested: मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुबाडणारा रीलस्टार शैलेश रामुगडेला पोलिसांनी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: उच्चशिक्षित आणि मोठ्या पदावर नोकरीला असलेल्या तरुणींशी इन्स्टाग्रामवर आधी मैत्री करायची आणि त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून विविध प्रकारचे बहाणे करून त्यांच्याकडून दागिने आणि पैसे उकळून त्यांची फसवणूक करणारा रीलस्टार शैलेश रामुगडे याला डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी  बेड्या ठोकल्या. या प्रकरणात मुंबई आणि ठाण्यात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या एका उच्चभ्रू कुटुंबातील तरुणीकडे असलेले दागिने अचानक गायब झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात दागिने कुठे गेले, म्हणून तिच्या कुटुंबीयांनी त्या तरुणीकडे विचारपूस केली. तेव्हा त्या तरुणीने तिच्या प्रियकराला सर्व दागिने दिल्याचे उघड झाले. शैलेश रामुगडे   लोकप्रिय रीलस्टार आहे. बीएमडब्ल्यू, चार महागडे आयफोन हस्तगतगुन्हा दाखल झाला होताच, रामुगडे याला त्याच्या ठाण्यातील राहत्या घरातून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक कोटीची बीएमडब्लू कार, ३७ लाखांचे दागिने आणि चार महागडे आयफोन हस्तगत केले. फसवणूक झालेल्या तरुणींपैकी काही  उच्चशिक्षित आणि तर काही आयटी इंजिनीअर आहेत. रामुगडेच्या विरोधात आणखी तक्रारी येण्याची शक्यता सहायक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली. रामुगडेने दोन वेबसीरीजमध्येही काम केले आहे. त्याने डोंबिवलीतील अनेक तरुणींना अशाच पद्धतीने फसवल्याचेही उघड झाले आहे.