Next

बारवी धरणाचे सहा दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 01:38 PM2019-08-04T13:38:49+5:302019-08-04T13:39:03+5:30

सद्यस्थितीत बारवी धरण परिसरात पाऊस होत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.

बदलापूर - शनिवारी  संध्याकाळी बारवी धरणात ७१.४९ मी. एवढा पाणीसाठा होता. धरणातील पाणीसाठ्याची उच्चतम उंची ७२.६० मी. एवढी आहे. सद्यस्थितीत बारवी धरण परिसरात पाऊस होत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सद्यस्थितीत सुरु असलेले पर्जन्यमान विचारात घेता बारवी धरणात उच्चतम मर्यादेपर्यंत पाण्याची आवक वाढल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.