Next

मटका अड्ड्यावर हप्ता घेणाऱ्या पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 16:51 IST2018-08-04T16:50:37+5:302018-08-04T16:51:41+5:30

'अर्थ'पूर्ण संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सातारा : मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेल्या तीन पोलिसांची व्हिडीओ क्लिप बनवून एका नागरिकानं पोलीस यंत्रणेचा भांडाफोड केला आहे. या स्टिंग ऑपरेशन’मध्ये ‘साहेबांना आता तीन हजार दिले आहेत. उरलेले तीन हजार संध्याकाळी देतो,’ असं संभाषण पाहायला आणि ऐकायला येत आहे.