Next

बावधनच्या बगाड यात्रेत ‘काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 17:09 IST2018-03-06T17:09:22+5:302018-03-06T17:09:43+5:30

बावधन (सातारा) : वाई तालुक्यातील बावधन येथील ऐतिहासिक बगाड यात्रेत मंगळवारी लाखो भाविकांनी ‘काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष केला. यात्रेला ...

बावधन (सातारा) : वाई तालुक्यातील बावधन येथील ऐतिहासिक बगाड यात्रेत मंगळवारी लाखो भाविकांनी ‘काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष केला. यात्रेला सकाळी दहा वाजता उत्साहात प्रारंभ झाला. सोमेश्वर येथील कृष्णातीरी बगाड्याला स्नान घालण्यात आले. त्यानंतर कृष्णामाईला ओटी अर्पण करून बगाड्याला गणवेश पेहराव घालण्यात आला. येथील काळभैरवनाथ देवाची यात्रा रंगपंचमीला साजरी होते.