राष्ट्रगीत सुरू असताना भाजपाच्या उपनगराध्यक्षांचा धिंगाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 20:20 IST2018-03-24T20:17:59+5:302018-03-24T20:20:45+5:30
लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात मासिक सभा बुधवार, दि. २१ रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेक विषयांवरून वादळी चर्चा ...
लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात मासिक सभा बुधवार, दि. २१ रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेक विषयांवरून वादळी चर्चा सुरू झाली. आपण दाखल केलेल्या ठरावांचे वाचन होत नाही, असा आरोप करत उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी मुख्याधिकारी अभिजित परदेशी यांना धारेवर धरले. दरम्यान, सभा संपल्याचे जाहीर करत नगराध्यक्षा स्नेहलता शेळके यांनी राष्ट्रगीत सुरू करण्याची सूचना केली. राष्ट्रगीताला प्रारंभ होताच पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवक उभे राहिले. मात्र, भाजपचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.