Next

रत्नागिरीच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 15:11 IST2018-03-26T15:10:20+5:302018-03-26T15:11:33+5:30

रत्नागिरी  - माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक ...

रत्नागिरी  - माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.  परिषदेने आपल्या विविध मागण्यांसाठीचा आजचा धरणे आंदोलन कार्यक्रम आधीच जाहीर केला होता. मात्र तरीही शासकीय कामाचे निमित्त काढून शिक्षणाधिकारी क्षीरसागर रत्नागिरीत हजर नाहीत. असे कोणतेही काम आज नसून ते जाणीवपूर्वकच गैरहजर असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे.   (व्हिडिओ - संदेश पवार)