Next

एका दिवसात पुण्यातील या ठिकाणांना नक्की भेट द्या | Places To Visit In Pune | One Day Return Trip

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 10:11 AM2021-01-25T10:11:04+5:302021-01-25T10:11:35+5:30

पुणे शहराला विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक विकएन्डला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहर मुंबई शहरापासून जवळ असल्याने शनिवार आणि रविवार पुण्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यास काहीच हरकत नाही. पुणे शहराला स्वतःची एक ओळख, संस्कृती आणि इतिहास आहे. पुणे शहरात कोणत्याही ऋतूत आल्हाददायक वातावरण असते. शिवाय पुण्याच्या आसपास अशी काही थंड हवेची ठिकाणं आहेत जिथे तुम्ही उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही ‘पिकनिक’साठी नक्कीच जाऊ शकता. त्यातही पुण्यात जाऊन तिथले वाडे पाहणे म्हणजे पर्वणीच असते.सो आज आपण जाणून घेऊयात जर एक दिवस पुण्याला जायचं असेल तर तिथे कोणत्या famous ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.