Sushma Swaraj Death: जेव्हा सुषमा स्वराज यांनी जगासमोर पाकिस्तानला फटकारले तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 13:40 IST2019-08-07T13:39:42+5:302019-08-07T13:40:47+5:30
नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र महासभेच्या 73 व्या परिषदेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर कडाडून हल्ला केला होता. ...
नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र महासभेच्या 73 व्या परिषदेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर कडाडून हल्ला केला होता. दहशतवादाला खतपाणी देण्याचं काम पाकिस्तानकडून केलं जात असल्याचं आरोप सुषमा स्वराज यांनी केलं होतं. भारत दहशतवादाचा शिकार होत आहे. दहशतवादाचं आव्हान आमच्या शेजारील देशाशिवाय कुठून येत नाही. पाकिस्तान असा देश आहे की, दहशतवाद पसरविण्यासोबतच केलेलं कृत्य लपविण्यातही ते माहीर आहेत अशा शब्दात सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला फटकारले होते.