Next

बापरे! नागरी वस्तीत घुसलेल्या मगरीच्या तावडीतून कुत्रा थोडक्यात बचावला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 12:44 PM2019-08-02T12:44:47+5:302019-08-02T12:47:13+5:30

नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुराचं पाणी शहरात घुसले आहे.

वडोदरा - गुजरातमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झालीय. पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुराचं पाणी शहरात घुसले आहे. अशातच नदीतील मगर चक्क रहिवाशी परिसरात आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पुराच्या पाण्याबरोबर ही मगर नागरीवस्तीत घुसली. यावेळी स्थानिकांनी मोबाईलमध्ये मगरीचे व्हिडीओ कैद केलेत.