Next

३ राज्यात ४ मुख्यमंत्री बदलले | आता पाचवा बदलण्याची तयारी सुरु | Haryana CM Changes | BJP | India

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 04:57 PM2021-10-06T16:57:32+5:302021-10-06T16:57:52+5:30

भारतीय जनता पक्षानं तीन राज्यांमध्ये चार मुख्यमंत्री बदललेत. उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातचे मुख्यमंत्री भाजपनं काही महिन्यात बदललेत. आता आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपचेच नेते याबद्दलचे उघडपणे इशारे देत आहेत. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना हटवण्यात येणार आहे, असा दावा विधानपरिषदेचे आमदार विरेंद्र गुज्जर यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय.