Next

सिव्हीलच्या कर्मचाऱ्यांचा स्वॅब घेण्यातही चालढकल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 03:54 PM2020-06-05T15:54:18+5:302020-06-05T16:01:10+5:30

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सिव्हीलमध्ये कार्यरत सर्व डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे स्वॅब घेण्यास तत्त्वत: मंजुरी दिली. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही प्रशासनाकडून सिव्हीलमध्ये कार्यरत या सेवारत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन त्यांचे अहवाल तपासणीला पाठविण्याबाबत चालढकलचे धोरण अवलंबले जात आहे, तर प्रशासनाला अद्याप राज्य शासनाकडून निर्देश आले नसल्याचा दावा जिल्हा शल्य चिकित्सकांनी केला आहे.

ठळक मुद्देलक्षणे दिसल्यासच स्वॅब घेणारसंघटना आंदोलनात्मक पवित्रा घेणार

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सिव्हीलमध्ये कार्यरत सर्व डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे स्वॅब घेण्यास तत्त्वत: मंजुरी दिली. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही प्रशासनाकडून सिव्हीलमध्ये कार्यरत या सेवारत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन त्यांचे अहवाल तपासणीला पाठविण्याबाबत चालढकलचे धोरण अवलंबले जात आहे, तर प्रशासनाला अद्याप राज्य शासनाकडून निर्देश आले नसल्याचा दावा जिल्हा शल्य चिकित्सकांनी केला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक धोकादायक परिस्थितीत कार्यरत असणा-या डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञ आणि सर्व सहायक कर्मचा-यांचे नियमितपणे स्वॅब घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने मान्य केले. प्रशासनाने या नियमाची अंमलबजावणी ताबडतोब करण्याचे मान्य केल्याने सर्व कर्मचा-यांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला.अत्यंत धोकादायक परिस्थितीत जिवावर उदार होऊन कार्यरत राहणा-या आरोग्य यंत्रणेतील या कर्मचा-यांची नियमित तपासणी होणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, अपुरे कर्मचारी, यंत्रणेतील त्रुटी आणि एकूणच कर्मचा-यांच्या सुरक्षेबाबत असलेल्या अनास्थेमुळे आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील कर्मचा-यांचा नियमितपणे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात येत नव्हती. मात्र, सर्व डॉक्टर्स आणि कर्मचा-यांनी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक आणि प्रशासन अधिका-यांची भेट घेऊन स्वॅब नियमितपणे घेतला जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.