नाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 19:15 IST2018-08-21T19:15:18+5:302018-08-21T19:15:43+5:30
नाशिक - मागील दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर शहरातही पावसाच्या दमदार सरींची संततधार सुरू ...
नाशिक - मागील दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर शहरातही पावसाच्या दमदार सरींची संततधार सुरू आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरणाच्या साठ्यात वाढ होत असल्याने विसर्ग गोदापत्रात सुरूच आहे. सुमारे 1हजार आठशे कुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ झाली असून लहान मंदिरे, पूल पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविला जाणार आहे. धरण 91 टक्के भरले आहे. (व्हिडीओ : अझहर शेख)