फडणवीस गेले आणि पक्ष फुटला, असं राऊत का म्हणाले? Sanjay Raut On Devendra Fadnavis
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:06 IST2022-01-13T18:05:42+5:302022-01-13T18:06:10+5:30
भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री @Devendra Fadnavis यांच्याकडे एक महत्वाची जबाबदारी दिलीय. आणि याचं जबाबदारीवर शिवसेना खासदार @Sanjay Raut यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. फडणवीस यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोव्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिलीय. गोव्यात भाजप विरुद्ध सर्व पक्ष असा सामना रंगण्याची शक्यताही बोलून दाखवली जातेय. त्यामुळे गोव्यात भाजप विरोधी शक्तींना रोखण्यासाठी भाजपकडून डावपेच खेळले जातायत. असं असताना गोव्यात भाजपलाच धक्के बसू लागलेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मागच्या काही दिवसांत भाजपच्या चार आमदारांनी पक्ष सोडलाय... यावरच बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीस गेले आणि पक्ष फुटला असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय...