Next

Weather Update : कसोटीचा काळ; 'या' जिल्ह्यांत ४-५ दिवस मुसळधार पाऊस; Yellow Alert | Heavy Rain

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 16:01 IST2021-10-06T16:01:26+5:302021-10-06T16:01:41+5:30

मुंबई, राज्य आणि देशभरात ठिकठिकाणी धिंगाणा घालणारा मान्सून बुधवारपासून परतीच्या वाटेला लागण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानंच हा अंदाज वर्तवलाय. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू व्हायला अनुकूल वातावरण आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. परतीचा पाऊस राजस्थानातून सुरू होईल.