Next

प्रसिद्धीसाठी शिवराळ भाषेतील रिल्स, 'थेरगाव क्वीन' अडचणीत, पाहा काय झालं? Insta Reel Queen arrested

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:56 PM2022-01-31T22:56:12+5:302022-01-31T22:57:03+5:30

मागील काही दिवसांपासून इंस्टाग्रामवरील थेरगाव क्वीन या प्रोफाइलने सोशल मीडियात चांगलाच धुमाकूळ घातलाय.. पिंपरी-चिंचवडचा थेरगाव परिसरातील साक्षी श्रीश्रीमल या तरुणीचं हे प्रोफाइल.. या प्रोफाइलवर साक्षी रिल्स शेअर करायची.. तिच्या प्रत्येक रिल्समध्ये शिवराळ आणि धमकीवजा भाषा आहे.. इंस्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोवर्स आहेत.. तिचे अनेक रिल्स व्हायरल ही झाले आहेत.. व्हायरल झालेल्या या रिल्सवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या..तिच्या प्रत्येक रिल्समध्ये अश्लील भाषा असल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला अनेकदा रोस्टही केलय..तर अनेक नेटकऱ्यांनी या तरुणीविरोधात कारवाई कशी होत नाही असा सवालही अनेकदा उपस्थित केला होता.. त्यानंतर आता पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत थेरगाव क्वीन आणि तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :पुणेPune