देवेंद्र फडणवीसांच्या मार्गत शरद पवारांचा खोडा | Devendra Fadnavis vs Sharad Pawar | Goa Elections
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 17:43 IST2022-01-13T17:43:14+5:302022-01-13T17:43:36+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गात पुन्हा शरद पवारांनी एन्ट्री केलेय... आणि महाविकास आघाडी २ चा नारा पवारांनी दिलाय... या आधी महाराष्ट्रात मविआचा प्रयोग करून पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवलं... फडणवीसांना विरोधीपक्षनेते पदी बसवलं.. तर आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ज्या गोव्याचं प्रभारीपद आहे, तिथे पवारांनी एन्ट्री केलेय... राष्ट्रवादी काँग्रेस गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे... आणि इथे भाजपच्या थेट प्रतिस्पर्ध्य्यांशी हात मिळवणी करून पवार भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत... स्वतः पवारांनी जाहीर पत्रकार परिषदेत त्यांचे संकेत दिलेत... आधीच गोव्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरची डोकेदुखी वाढलेय..