Next

Sharad Pawar नाराज, Wineचा निर्णय Uddhav Thackeray Government मागे घेणार?Sale of Wine in Supermarket

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 03:56 PM2022-02-03T15:56:11+5:302022-02-03T15:56:32+5:30

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं गेल्या आठवड्यात घेतला. या निर्णयाला मोठा विरोध होतोय, पण आता खुद्द शरद पवारच उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या या निर्णयावरुन नाराज असल्याचं समजतंय. शरद पवार कोव्हिडमधून नुकतेच बरे झालेले आहेत आणि ते पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आलेत. पवार उपचार घेत होते तेव्हा हा वाईनसंबंधीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. आता पवारांनी वाईनच्या निर्णयावर सूचक विधान केलंय ज्यामुळे पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. पवार नेमकं काय म्हणालेत, पवार वाईनसंबंधीच्या निर्णय़ावर नाराज झालेत का, ठाकरे सरकार वाईनसंबंधीचा निर्णय परत घेणार का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात शरद पवारांनी नेमकं काय विधान केलंय ते. वाईन सुपर मार्केटमध्ये विकण्यासंबंधी शरद पवार म्हणतायत की...