सेनेचा कोकण दौरा, राणे-ठाकरे पुन्हा आमनेसामने...कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? Rane Thackeray-Konkan
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 13:40 IST2022-02-07T13:39:50+5:302022-02-07T13:40:19+5:30
पुन्हा एकदा राणे-ठाकरे आमनेसामने येणार आहेत. युवासेना प्रमुख, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तळकोकणात दौऱ्यावर जाणार आहेत, विशेष म्हणजे सिंधुदुर्गात आदित्य तळ ठोकणार आहेत, दंड थोपटणार आहेत. विधिमंडळात आदित्य ठाकरेंना म्याव म्याव करत डिवचल्यामुळेच नितेश राणेंना अटक झाली अशी चर्चा आहे. त्यात नितेश राणे तुरुंगात आहेत, भाऊ निलेश राणे त्यामुळे चिडलेत, खुद्द नारायण राणे अस्वस्थ आहेत. आता याच सगळ्या धावपळीत नेमका आदित्य ठाकरेंनी सिंधुदुर्ग दौरा आयोजित केलाय.