Next

जितेंद्र आव्हाडांनी गणपतीची आरती केली, पण..| BJP Tushar Bhosale on Jitendra Awhad | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 05:09 PM2021-07-21T17:09:14+5:302021-07-21T17:09:49+5:30

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे नेहमीच चर्चेत असणारे नेते.. आता त्यांनी केलेली गणपती बाप्पाची आरती चर्चेचा विषय ठरलाय.. रविवारी जितेंद्र आव्हाड नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांनी आनंदवली येथील नवशा गणपती मंदिरात आरती केली. यावेळी अनेक कार्यकर्तेही त्यांच्यासोबत होते. मोठ्या भक्तीभावाने सर्वांनी आरती केली. घालीन लोटांगण करुन सर्वांनी आरती घेतली.. पण कायद्याचा प्रसाद मात्र फक्त कार्यकर्यांना मिळालाय..आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला म्हणून मंत्री जितेंद्र आव्हाड यांना वगळता अन्य पाच कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय..

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :जितेंद्र आव्हाडभाजपाJitendra AwhadBJP