Next

Pornographic रॅकेटचा पहिला तपास अधिकारी सचिन वाझे | Raj Kundra Arrested | Sachin Vaze Conections

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 06:13 PM2021-07-21T18:13:37+5:302021-07-21T18:14:09+5:30

राज कुंद्राला अटक करण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच या पोर्नोग्राफी रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. फिल्म कलाकार गहना वसिष्ठ हिला अटक झाली होती. याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ४ तारखेला क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने मालाडच्या मार्वे ईथे ग्रीन पार्क या बंगल्यावर धाड टाकली होती आणि एका महिलेला सोडवलं होतं. त्यावेळी त्यांनी शूटींगचं साहित्य जप्त केलं होतं. पाच जणांना त्यावेळी अटक झाली होती. जेव्हां हे रॅकेट उघड झालं तेव्हा त्या प्रकरणाचा पहिला तपास अधिकारी होता सचिन वाझे - होय, तोच सचिन वाझे ज्याने मनसुख हिेरेनची हत्या घडवली आणि आता तळोजा जेलमध्ये आहे. वाझेला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिस दलाच्या स्वच्छता मोहीमेत ६८ पोलिसांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यातले अनेक पोलिस हे याच पोर्नोग्राफिक रॅकेटच्या तपासातले होते. त्यामुळे तपासाला उशीर झाल्याचं एका पोलिस अधिकाऱ्याने द टाईम्स ऑफ ईंडियाला सांगितलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :राज कुंद्रासचिन वाझेमुंबई पोलीसRaj Kundrasachin VazeMumbai police