Coronaआल्यापासून पहिल्यांदाच मुंबईत एकही मृत्यू नाही! Mumbai reports 0 deaths since Corona Pandemic
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 15:47 IST2021-10-18T15:47:30+5:302021-10-18T15:47:49+5:30
भयानक कोरोना महामारी सुरू झाल्यापासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रुग्णवाढ होतच होती. आता मात्र, सर्वत्र कोरोना स्थिती नियंत्रणात येत असून मुंबईतील कोरोना रुग्ण सापडण्याचं प्रमाणही खूप कमी झालं आहे. विशेष म्हणजे रविवारी मुंबईत कोरोनामुळं एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ही मुंबईकरांसाठी खूप दिलासादायक बाब आहे.