Next

अखेर उद्धव ठाकरे बोलले, पण निशाण्यावर कोण? CM Uddhav Thackeray speaks on upcoming BMC election

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 03:58 PM2022-01-06T15:58:23+5:302022-01-06T15:58:51+5:30

'वेळ आल्यावर दाखवतोच..' मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाच्या ठिकाणी असलेली अनुपस्थिती, दीर्घकाळ घरातून काम करणे, मर्यादित जनसंपर्क यांसारख्या मुद्द्यांवरून विरोधक त्यांच्यावर अनेकदा टीका करतात.. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित नव्हते... त्यांच्या अनुपस्थितीची बरीच चर्चा झाली.. मुख्यमंत्री पदाचा पदभार दुसर्‍या कुणाकडेतरी सोपवावा अशी मागणी देखील विरोधकांनी केलीय.. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र शांत होते.. परंतु आता मात्र त्यांनी आपलं मौन सोडलंय... नेमकं झालं काय? उद्धव ठाकरे काय बोलले, कुणाला बोलले पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून...