आ. सुरेश धस यांच्यावर एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप | BJP MLA Suresh Dhas | ED
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 14:15 IST2021-12-16T14:14:55+5:302021-12-16T14:15:22+5:30
Suresh Dhas ED : राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीची पिडा सुरु आहे. नवनवीन आरोप होतायत, छापेमारी केली जातेय. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर टीकाही केलीय जातेय. आता या ईडीच्या राजकारणात भाजप आमदाराचं नाव आलंय. भाजपच्या एका आमदारांमागे ईडी लागणार का? याची चर्चा आता सुरु झालीय. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या २०० हेक्टर जमिनी हडप करून त्याच एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय. सुरेश धस हे माजी मंत्री आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत...