सचिन वाझेंच्या दबदब्याचा एक किस्सा | Sachin Vaze | Mansukh Hiren Case | Maharashtra News
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 16:59 IST2021-04-03T16:59:13+5:302021-04-03T16:59:29+5:30
मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या मते, सचिन वाझे इतका लबाड अधिकारी होता, की गाडी चोरीचा FIR दाखल करण्यापूर्वी मनसुख हिरेन यांना त्यांच्या गाडीत एक आठवड्यानंतर जिलेटिन ठेवणार आहे याची हिंट दिली असेल असं वाटत नाही. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन ठेवल्यानंतर ४८ तासाच्या आत काही तपास यंत्रणेकडून सचिन वाझे यांच्याभोवती संशय निर्माण झाला. ही गोष्ट सचिन वाझेला समजली, तेव्हा सचिन वाझेने स्वत:ला वाचवण्यासाठी मनसुख हिरेन यांच्यावर गुन्हा स्वीकारण्यासाठी दबाव टाकला... सचिन वाझेच्या दबावाला मनसुख हिरेन बळी पडले नाहीत.