Next

'तुमका मेळपाक' म्हणत आदित्यची गोव्यात एंट्री, SHIV SENA चमत्कार घडवणार? Aditya Thackeray Goa

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 01:07 AM2022-02-12T01:07:39+5:302022-02-12T01:08:05+5:30

गोवा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास उरलेत, त्यातच शिवसेनेनं आपला हुकमी एक्का बाहेर काढलाय. युवासेनाप्रमुख आणि राज्याचे पर्यनटमंत्री आदित्य ठाकरे खुद्द गोव्यात प्रचारात उतरलेत. एकीकडे मोदींची म्हापुशात सभा झाली, अमित शहांनी आपला गोवा मुक्काम वाढवला त्यातच आता शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंची एंट्री झालीय. आदित्य ठाकरेंच्या एंट्रीचा शिवसेनेला कितपत फायदा होईल, गोव्यात शिवसेनेला आपले आधीचे रेकॉर्ड्स मोडेल का, डिपॉझिट वाचवू शकेल का यावरच बोलुयात पुढच्या तीनमिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात आदित्य ठाकरेंच्या गोवा दौऱ्याची खबरबात. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट शेअर केलीय, या पोस्टवरुनच आदित्य ठाकरेंचा गोवा दौरा किती झंझावाती आहे याची तुम्ही कल्पना करु शकता...