गेल्या 75 दिवसांत अनेक कठोर निर्णय घेतले - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 19:56 IST2019-08-23T19:55:40+5:302019-08-23T19:56:01+5:30
पॅरिस - भारतात आता टेम्पररी व्यवस्थेला स्थान नाही. तुम्ही पाहिले असेल की 125 कोटी लोकांचा देश, गांधी आणि बुद्धांची भूमी, ...
पॅरिस - भारतात आता टेम्पररी व्यवस्थेला स्थान नाही. तुम्ही पाहिले असेल की 125 कोटी लोकांचा देश, गांधी आणि बुद्धांची भूमी, राम-कृष्णाच्या भूमीवरून टेम्पररीला काढता काढता 70 वर्षे निघून गेली. टेम्पररी गोष्ट घालवण्यासाठी 70 वर्षे, मला तर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले होते,'' असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम 370 वरून लगावला.