Next

आदिवासींनो, नक्षलवर भरोसा नाय का...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 04:54 PM2017-07-29T16:54:57+5:302017-07-29T16:55:15+5:30

नक्षलवादाने होरपळून निघत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात व्हायरल झालेल्या सोनू गाण्याचा उपयोग नक्षलवाद्यांविरूद्ध आदिवासी लोकांना जागरूक करण्यासाठी केला जात आहे.

सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असलेले ‘..भरोसा नाय का?’ हे गाणे चांगलेच हिट झाले आहे. मूळ गाण्याची चाल आणि ठेका कायम ठेवत त्यात राजकारणापासून ते सामाजिक समस्यांवर विडंबन केले जात आहे. नक्षलवादाने होरपळून निघत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही या गाण्याचा उपयोग नक्षलवाद्यांविरूद्ध आदिवासी लोकांना जागरूक करण्यासाठी केला जात आहे.